आज २७-०२-२०१३.
कुसुमाग्रजांचा जन्मदिन. ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शने आयोजित करून हा दिवस साजरा केला
जातो. तीनसव्वातीनला भ्रमणध्वनीने पांचजन्य केला. शरदराव होते. कांदळगांवच्या
ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन सुरू आहे म्हणाले. दुचाकीला कळ दाबून प्रेरणा दिली आणि
निघालो. हल्ली लाथ न मारता सुरू होणार्या दुचाक्या आहेत हे बरेच आहे. गेलो.
आश्चर्याचा गोड धक्का बसला.
जुन्या पडघाईला आलेल्या इमारतीला ग्रंथप्रेमींच्या उत्साहाने आनंदमेळा भरला होता.
इथेही कर्णकटु संगीताचा उपद्रव नव्हता. मी इवल्याशा गावातल्या या ग्रंथालयाचा
अभ्यागत होतो ८४ क्रमांकाचा.
कांदळगांवकरांचा विजय असो. माझ्या उत्साहाचा वारू आता वेगाने दौडायला
लागला. प्रतिमाग्राहक सरसावून उगारला आणि सव्यसाची धनुर्धराप्रमाणे सटासट कळ दाबत
सुटलो.
उत्साहाने भारलेले
ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. पारकर
मागे उभ्या डावीकडून पहिल्या
आहेत ग्रंथपाल सौ. पारकर तर सर्वात उजवीकडे आहेत उत्साहाने उपस्थित राहिलेले
ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. पारकर आणि त्यांच्या शेजारी उभे आहेत श्री. शरद कदम.
सर्वात डावीकडे आहेत
ग्रंथसेवक श्री. महेश साळकर. एवढ्या तुटपुंज्या जागेत मांडणी उठावदार केली होती.
बाहेरच्या रणरणत्या उन्हामुळे
शरद कदम यांना मुखपृष्ठावरचे शहाळे आवडले असेल कां?. ऊन खरे पण शहाळे मात्र
चित्रातले! बहोत बेइन्साफी है. अन्याय! अन्याय!! अन्याय!!! अन्यायाचा निषेध असो.!
ग्रंथप्रेमींच्या उत्साहाला
दाद देतच प्रसन्नचित्ताने बाहेर पडलो.
- X – X – X -